आजचे राशिभविष्य दि २९ नोव्हेबर २०२२
दै. बातमीदार । २९ नोव्हेबर २०२२ । मेष– मित्रांकडून सहकार्य मिळेल. भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गरजूंना अन्नदान करा. आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे.
वृषभ– जोडीदाराचा सन्मान करा. गरीब माणसाला मदत करा. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
मिथुन– नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. कोणत्याही वादात पडू नका. व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे.
कर्क– नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पाठदुखीची समस्या तुम्हाला सतावेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
सिंह – क्रोधामुळे नुकसान होऊ शकते. आपले वाहन कोणालाही देऊ नका. रात्री उशिरापर्यंत जागू नका. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करा.
कन्या- तुमच्यातील चांगल्या वाईट गोष्टी कोणाला सांगू नका. बहिणीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. नातेसंबंधांचा आदर करा. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.
तुळ– नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक– नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. रखडलेले व्यवसाय चालू होतील. ज्येष्ठांचा आशीर्वीद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.
धनु– विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. आरोग्याची चिंता दूर होईल. आर्थिक चिंता दूर होईल. कोणताही निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
मकर– ऑफिस कामात व्यस्त असाल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उधार दिलेले पैले पुन्हा मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
कुंभ– आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. गरीब व्यक्तींना मदत करा. तुमची कामे वेळेवर पूर्ण करा. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
मीन– येणाऱ्या काही दिवसांत आजची मेहन खूप उपयुक्त ठरेल. पैसे मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. जवळच्या मित्रांना तुमच्या मनातील गोष्टी सांगा यामुळे समस्या सुटेल. आपण कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढण्यास सक्षम असाल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम