आजचे राशिभविष्य दि.४ सप्टेंबर २०२३

बातमी शेअर करा...

मेष राशी भविष्य – कामाचा ताण जास्त राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग – लाल.

वृषभ राशी भविष्य – व्यवसायवाढीसाठी अनुकूल वेळ आहे. सायंकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. संपत्तीवरुन कुटुंबात किंवा नातेवाईकांसोबत वाद होण्याची शक्यता. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण कराल. तांदूळ दान करा. आजचा शुभ रंग – पिवळा.

मिथुन राशी भविष्य – व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कराल. रखडलेले काम मार्गी लागेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अन्नधान्य दान करा. आजचा शुभ रंग – जांभळा.

कर्क राशी भविष्य – विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. रिअल इस्टेट आणि शेअर बाजारात गुंतवणूक कराल. आज गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळेल. व्यापारात चांगली डील होईल. आजचा शुभ रंग – नारंगी.

सिंह राशी भविष्य – नोकरीच्या ठिकाणी ताण-तणाव जाणवण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. दूरचा प्रवास होऊ शकतो. आजचा शुभ रंग – निळा.

कन्या राशी भविष्य – विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. परदेशवारी होण्याचा योग जुळून येईल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. श्री गणेश आणि महादेव यांची उपासना करा. आजचा शुभ रंग – पिवळा.

तूळ राशी भविष्य – कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती येईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. मन प्रसन्न असेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग – पांढरा.

वृश्चिक राशी भविष्य – खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कराल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. आजचा शुभ रंग – जांभळा.

धनु राशी भविष्य – धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. प्रेमी जोडप्यांना आजचा दिवसभरात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – लाल.

मकर राशी भविष्य – विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. नवीन गाडी किंवा स्मार्टफोन खरेदीचा विचार कराल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग – पिवळा.

कुंभ राशी भविष्य – व्यवसायाच्या संदर्भात तणाव जाणवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी योग्यवेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. वेळ वाया घालवू नका. एखाद्याला उधार दिलेले पैसे संध्याकाळनंतर मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

मीन राशी भविष्य – कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात येईल. ताण-तणाव जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – नारंगी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम