
आजचे राशीभविष्य, शनिवार १७ सप्टेंबर २०२२
दै. बातमीदार | १७ सप्टेंबर २०२२ | मेष – दुसर्यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.
वृषभ – सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.
मिथुन – अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.
कर्क – अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.
सिंह – निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.
कन्या – परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
तूळ – समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.
वृश्चिक – दुसर्याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.
धनू – तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर – दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.
कुंभ – नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.
मीन – जोडीदाराची प्रगति होईल. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम