आजचे राशीभविष्य, सोमवार १ ऑगस्ट २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ ऑगस्ट २०२२ । मेष – स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.

वृषभ – कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

मिथुन – कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

कर्क – भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.

सिंह – पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.

कन्या – मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. विशाल दृष्टीकोन बाळगावा.

तूळ – नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.

वृश्चिक – प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.

धनू – आज कामातून चांगला लाभ होईल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.

मकर – व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल.

कुंभ – योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.

मीन – वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम