
आजचे राशीभविष्य, रविवार 24 जुलै 2022
दै. बातमीदार | 24 जुलै 2022 | मेष:- आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
वृषभ:-
व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.
मिथुन:-
अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.
कर्क:-
साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.
सिंह:-
वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल.
कन्या:-
प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अति जोखीम पत्करू नका.
तूळ:-
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते.
वृश्चिक:-
अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लाडू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
धनू:-
कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल.
मकर:-
कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.
कुंभ:-
सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा.
मीन:-
मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम