आजचे राशीभविष्य, मंगळवार १२ जुलै २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १२ जुलै २०२२ | मेष:-

सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत. उगाचच बंधनात अडकून राहू नका.

वृषभ:-

आर्थिक प्रश्न मिटतील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो.

मिथुन:-

एकसूत्री विचार करावा. धरसोडपणे कामे करू नयेत. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका.

कर्क:-

मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. फसव्या लोकांपासून सावध राहावे. अति विचाराने थकवा जाणवेल.

सिंह:-

तडजोडीला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. विचारांची दिशा बदलावी लागेल. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत.
कन्या:-

चिंतामुक्त जगावे. पत्नीच्या विचारांशी तडजोड करावी लागेल. अधिकारी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:-

दिवसभर कामात गुंग राहाल. आजचा दिवस लाभदायक असेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते.

वृश्चिक:-

उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी. घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

धनू:-

जोडीदाराशी अनबन होऊ शकते. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा.

मकर:-

मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल. मनातील मरगळ काढून टाकता येईल.

कुंभ:-

बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल. घरातील स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल.

मीन:-

मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल. मित्रांची वेळेवर मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम