सबगव्हाण टोल नाक्यावर येणाऱ्या स्थानिक वाहनांना ७ दिवसांच्या आत टोल मुक्ती द्या – अमोल पाटील

बातमी शेअर करा...

पारोळा

सबगव्हाण टोल नाक्यापासून २० कि.मी.च्या आत पारोळा शहरासह सभोवतालील ग्रामीण भाग हे कार्यक्षेत्र येते. येथे दैनंदिन शालेय-महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, दैनंदिन रुग्ण, आपला उदरनिर्वाह भागविणारे कामगार, वाहन चालक हे ये-जा करीत असतात. यात टोलच्या दरामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खिशाला कैची लागते. त्यामुळे हा टोलनाका सुरु झाल्यापासून दैनंदिन नागरिकांना ह्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.

दैनंदिन प्रवास करणारे वाहन धारक हे स्थानिक असल्याचे आवश्यक ते पुरावे देखील सादर करीत असतात, परंतु तरी देखील टोलव्यवस्थापकाचा मनमानी कारभारामुळे टोलदर हा भरावाच लागतो.

आज या रस्त्यावर दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन धारक यांनी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोल पाटील यांची भेट घेतली व त्यांना होत असलेला दैनंदिन त्रास हा लक्षात आणून दिला,

यावर अमोल पाटील यांनी या नागरिकांसह टोलनाका गाठला, दैनंदिन सुरु असलेल्या समस्यांना आपल्या मार्फत आजवर फक्त आश्वासने देण्यात आली, परंतु स्थानिक नागरिकांना कुठेही याचा लाभ देण्यात आला नाही, दैनंदिन सुरु असलेली लुट ही येत्या ७ दिवसांच्या आत बंद करा, अन्यथा या टोलाची तोड-फोड करून टोल बंद करण्याचा सूचना अमोल पाटील यांनी टोल व्यवस्थापकांना दिल्या.

प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, या मार्गाने दैनंदिन रहदारी करणारे वाहन धारक उपस्थित

होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम