बापरे | टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो.

बातमी शेअर करा...

येणारा प्रत्येक दिवस महागाईमुळं सर्वामान्यांची झोप उडवताना दिसत आहे. श्वासोच्छवासासाठीची हवा काय ती सध्या मोफत असल्याचे म्हणत आता स्वतः त्रासलेल्या सर्वसामान्यांनीच या दरवाढीवर उपरोधिक टीका करण्यास सुरुवात केली आहे. कारण, रोजच्या वापरातील अन्नपदार्थांच्या किमतीही इतक्या वाढल्या की आता अन्नाचे दोन घास खाणंही अनेकांसाठीच कठीण होऊन बसलं आहे.

पाकिस्तानात टोमॅटो 500 रूपये, कांदे 400 रूपये, बटाटा 120 रूपये किलो इतक्या किमतीने विकला जाताय . लाहोर, पंजाब प्रांतातल्या पूरस्थितीमुळे पाकिस्तानात भाज्यांच्या किंमती कमालीच्या कडाडल्या आहेत. त्यामुळे आता भारतातून भाजी आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. दरम्यान, येत्या काळात हे दर 700 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानात आधीच महागाई थैमान घालतेय.

त्यात पूरस्थितीमुळे या महागाईत दुपटीने भर घातली आहे. बलुचिस्तान, सिंध, दक्षिण पंजाब भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली असल्यामुळे वाघा बॉर्डरवरून भाज्या मागवण्याचा विचार सध्या पाकिस्तान करत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम