![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/12/eknath-udhav.jpg)
उद्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार आमने-सामने
दैनिक बातमीदार I १८ डिसेंबर २०२२ I बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.
सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याचं दिसून येत आहे. या घटनाक्रमाला अजून वर्ष सुद्धा झालेले नाहीत. मात्र, अश्यातच मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे. करोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूर नगरी अधिवेशनासाठी सज्ज झाली असून, नागपुरात जागोजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, उद्या या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि राज्यात झालेलं सत्तांतर त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद होतो? उद्धव ठाकरे शिंदे सरकारला अधिवेशनात कसे फैलावर घेतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसेच, यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरुषांबाबतची अपमानास्पद वक्तव्ये, राज्यपालांचा राजीनामा, महिला सुरक्षा यावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमकतेला आता नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार कसं तोंड कसे देणार हे पाहणे महत्वाचे आहे.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम