राज्यातील ‘या’ भागात ५ दिवस तुफान पाऊस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  राज्यात गेल्या जून महिन्यापासून काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात मात्र अद्याप पाऊस नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आल्याचे दिसून येत असतांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाने पुन्ही हजेरी लावली आहे. तर मुंबई, उपनगर परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर आज वाढला आहे. तर अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे, सबवेखाली दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे. तर मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह कोकणात पावसाची हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागात आता पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात पुढचे 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम