लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीवर अत्याचार

यावल पोलिसात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ । लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरिक संबंध ठेऊन नंतर जबरदस्ती तीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी निलेश पंढरीनाथ पाटील असे  नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२१ ते जुन २०२२ पावेतो वेळोवेळी संशयित आरोपी निलेश पाटील याने पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयित आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारिरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणीला गर्भधारणा झाली. यानंतर निलेश याने पिडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा गर्भपात केला. या प्रकरणी दि. ८ ऑक्टोंबर रोजी बलात्कार, अॅट्रासीटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम