अमिताभच्या नातीने चालविले ट्रॅक्टर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मे २०२३ ।  दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या परिवारातील अनेक किस्से सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्याची खूप चर्चा होत असते. त्यातच त्यांची नात नव्या नवेली नंदा ही देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बिग बी आणि बच्चन कुटुंबातील इतरांसारखी अभिनेत्री नाही, पण बिझनेस वुमन बनून ती नक्कीच लोकांची मने जिंकत आहे. नव्या ही वुमन सेंट्रिक हेल्थ कंपनीची सह-संस्थापक आहे. अशात नव्याने नुकताच तिचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर चाहते काैतुकाच वर्षाव करत आहेत.

नव्या सध्या गुजरातमधील एका गावात आहे, जिथे ती स्थानिक लोकांची भेट घेट आहे. इतकंच नाही तर, नव्या झाडाखाली बसून गावकरी लाेकांशी चर्चा करत त्यांच्याशी चांगला वेळ घालवत आहे. यासाेबत नव्याने ट्रॅक्टरही चालवला आहे. अशात बिग बींची नात असूनही, सामान्य लोकांमध्ये वेळ घालवण्याची नव्याची साधी पद्धत पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. काहींनी तिच्या नम्र स्वभावाचे कौतुक केले, तर काहींनी तिचे ड्रायव्हिंग कौशल्य पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम