अभिनेत्री दुबे प्रकरणी या गायकाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ ।  देशात गेल्या काही वर्षापासून बॉलीवूड क्षेत्रातील अनेक अभिनेत्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहे. त्यात पुन्हा एक भर पडली भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आपली जीवनयात्रा संपविल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येवू लागले आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गायक आणि निर्माता समर सिंहला अटक केली आहे.

समर सिंहला गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर समर सिंह फरार झाला होता. आकांक्षाच्या आईने मुलीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप केला होता. यामध्ये तिने समरलाच आरोपी असल्याचे म्हटले होते. अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर समर सिंह फरार झाला होता. पोलिसही त्याच्या मागावर होते. आकांक्षाच्या आईने समरवर आपल्या मुलीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता.

काय घडले प्रकरण
२६ मार्च रोजी आकांक्षा दुबे वाराणसीतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आकांक्षा भोजपुरी गायक समर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. लग्नाच्या बहाण्याने शरीर संबंध निर्माण केले. समरने आकांक्षाचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे. आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यंदा व्हॅलेंटाईन डेला आकांक्षानेच या नात्याचा खुलासा केला होता. मृत्यूच्या एक दिवस आधी आकांक्षा आणि समर एका पार्टीला गेले होते. 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीसाठी निघाली तेव्हा ती खूप खुश होती. ती ब्रेकअप पार्टी होती, असे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम