रेल्वेत प्रवास करत आहात : या तिकिटावर मिळणार सवलत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ फेब्रुवारी २०२३ । देशाच्या रेल्वे विभागात नेहमी जेष्ठ नागरिकांना विविध सूट देण्यात येत होती. कोविड महामारीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध श्रेणींमध्ये रद्द करण्यात आलेल्या सवलतींचा पुन्हा आढावा घेण्यात यावा. संसदेच्या रेल्वेविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंह यांनी नुकत्याच संसदेत सादर केलेल्या अहवालात याचा उल्लेख केला आहे.

समितीने म्हटले आहे की, कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना विविध श्रेणींमध्ये देण्यात येणारी सवलत बंद केली आहे. यामध्ये 58 वर्षांवरील महिलांना भाड्यात 50 सवलत आणि 60 वर्षांवरील पुरुषांना 40 सवलत देण्यात आली होती. साथीच्या आजारापूर्वी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 50 टक्के सूट मिळायची. आता कोविड-19 चा धोका कमी होऊन आणि देशात इतर सर्व प्रकारची कामे पूर्णत: सामान्य झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना हा दिलासा मिळाला नाही. दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूट पूर्ववत करू शकते. त्यांनी राज्यसभेत सांगितले की भारतीय रेल्वेने 2019-20 मध्ये प्रवासी तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे, जी प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती सुमारे 53 टक्के इतकी सवलत आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याचा विचार करत असल्याचे रेल्वे बोर्डाने सांगितले. रेल्वे अजूनही या विषयावर विचार करत आहे, परंतु आपल्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना किमान स्लीपर आणि 3 एसी सवलतींचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच वेळी, संसदीय पॅनेलने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सूट पुनर्संचयित करण्याची शिफारस देखील केली आहे. दुसरीकडे, अनारक्षित सामान्य तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने एक खास अॅप लाँच केले आहे. आता प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तिकीट काउंटरची संख्या कमी असल्याने अनेक वेळा प्रवाशांना तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागते. आता ही समस्या संपली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम