उर्फी जावेदचे या कारणाने तृप्ती देसाईंनी केले समर्थन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ । नेहमीच आपल्या वेगवेगळ्या लुकमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र कपड्यांमध्ये उर्फी लक्ष वेधून घेताना दिसते. अनेकांनी तिच्या या कपड्यांवर आक्षेपही घेतला आहे. मात्र भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी उर्फीचं समर्थन केलं आहे. तसेच “संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तिला जसे कपडे परिधान करायचे आहेत, तसे ती करू शकते,” असे म्हंटले आहे.

एका मुलाखतीमध्ये तृप्ती देसाई यांनी उर्फीच्या हटके फॅशनविषयी प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीच्या वेळी उर्फीने हिरव्या रंगाचा जाळीदार ड्रेस घातलेला एक व्हिडीओ दाखविण्यात आला होता. यावर तृप्ती देसाई म्हणाल्या, “उर्फी जावेद ही अभिनेत्री व मॉडेल आहे. उर्फीला जे वाटतं ते तिने करावं. तिचे कपडे परिधान करण्याची पद्धत काहींना आवडत असेल, तर काहींना आवडत नसेल. त्यासाठी तिला विरोध करणं चुकीचं आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “यातून महिलांबद्दलचे विचार, मानसिकता दिसून येते. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तिला जसा वेश करायचा आहे, जसे कपडे परिधान करायचे आहेत, तसे ती करू शकते. मी बिग बॉसच्या घरात असताना माझ्याबरोबर अनेक मॉडेल व अभिनेत्री होत्या. त्यांनीही वेगवेगळे कपडे परिधान केले होते.”

दरम्यान, उर्फी जावेदचा मुद्दा राजकीय वर्तुळात देखील चांगलाच गाजला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. याप्रकरणी तिची पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यावेळी देखील तृप्ती देसाई यांनी उर्फीला पाठिंबा दिला होता. “आपला देश संविधानावर चालतो. उर्फी जावेदने काय कपडे घालावेत किंवा घालू नयेत. हा तिचा निर्णय आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड किंवा अश्लील कपडे घातलेले आहेत. मात्र त्यावर कधीही कुणी आवाज उचलला नाही. त्यांच्या बाबतीत आताही बोलले जात नाही. उर्फी जावेदलाच भाजप का टार्गेट करत आहे. उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का?”, असा सवालही तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम