
दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ राज्यात गेल्या काही दिवसापासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, लहानपणी थंडी वाढली की आजी काहीना काही काढे करून पाजायची, आई रोज गरम दूध आणि हळद पेयला लावायची. हे रुटीन काहींच्याकडे अजूनही सुरू असेल. हिवाळा हा जितका चांगला तितकाच वाईट कारण सोबत साथीचे अनेक आजार घेऊन येतो. यात अजून एक गोष्ट आहे जिच्या नियमित सेवनाने थंडीचा तितका त्रास होत नाही आणि ती म्हणजे तिळाची चटणी; बघूया याची रेसिपी.
साहित्य: 1 वाटी पांढरे तीळ
1/2 वाटी शेंगदाणे
1 चमचा जिरं
1 चमचा बडीशेप
10-12 लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
1 चमचा लाल तिखट
कृती: तीळ कढई किंवा पॅन मध्ये भाजून घ्या. तीळ भाजतांना हाथाने पाण्याचा थोडासा शिपका मारा. म्हणजे तीळ छान खमंग भाजले जातील. तीळ छान भाजले की एका ताटात काढून घ्या.
नंतर त्याच कढई मध्ये शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप सुद्धा भाजून घ्या.
भाजेलेलं साहित्य एका ताटात घेऊन थंड करून घ्या. साहित्य थंड झालं कि मिक्सर च्या भांड्यात भाजेलेले तीळ, शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप घ्या. लसूण ऍड करा.
चवीनुसार मीठ घाला. लाल तिखट घाला. आणि मिक्सरला सर्व साहित्य भरड सारखं वाटून घ्या. आपली खमंग तिळाची चटणी तयात आहे. ही चटणी वरण भात, चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम