तुमचे वजन वाढले ‘हे’ करून बघा; होईल समाधान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० ऑक्टोबर २०२२ । घरात नेहमी प्रत्येक सदस्याकडे नेहमी आरोग्याविषयी नेहमी तक्रारी असतात, परंतु काही समस्या या लागलीच सुटत असतात तर काही मात्र कायमस्वरूपी राहत असतात, यातच ज्याचे वजन कमी होत नसेल त्यांच्यासाठी एक घरी बनविता येणारा हा एक उपाय आहे, आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यामध्ये हळद हा घटक असतोच. कारण स्वयंपाकातील हळद हा सर्वात महत्त्वाचा आणि पदार्थाला रंग आणणारा घटक आहे. आयुर्वेदात प्राचीन काळापासुन हळदीला खूप मानलं जातं, कारण हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की हळद पाण्यामध्ये टाकून तिचं पाणी पिल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होऊ शकतात.

हळदीच्या पाण्याचे काय आहे फायदे ?

1) वजन कमी करण्यासोबतच हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात.
2) रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने सांधेदुखी दूर होते.
3) हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. हे पाणी प्यायल्याने आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम