हिवाळ्यात केसांचा व त्वचेचा बचावासाठी हे करून पहा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । राज्यात गेल्या काही दिवसापासून हिवाळ्यातल्या थंडीचा जोर वाढू लागला आहे तर दुपारी उन तापू लागले आहे. हवेतील आर्द्रता (ओलावा) आणि तापमानाची पातळी हे दोन्ही कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी होणे, त्वचा व केसांमध्ये खाज सुटणे, कोरडेपणा आणि खडबडीतपणा वाढतो. त्यामुळेच थंड वातावरणात लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होते, तसेच केसांमधील मॉयश्चरायझरही कमी होते. थंड हवा आणि हीटरमधून मिळणारी कृत्रिम उष्णता यामुळे त्वचा आणि केसांमधील आर्द्रता कमी होते. ज्यामुळे कोरडी त्वचा तसेच केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते.
थंडीच्या दिवसात केस व त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

1) त्वचा मॉयश्चराइज करणे – त्वचेची योग्यप्रकारे काळजी घ्यायची असेल तर रोजच्या दिनचर्येमध्ये एका चांगल्या मॉयश्चरायजरचा समावेश करणे महत्वाचे ठरते. यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड तर राहतेच त्याशिवाय त्वचेला चमकही मिळते.

2) जास्तीत जास्त द्रव पदार्थ पिणे – आपली त्वचा हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे असते. थंडीत तशीही तहान कमी लागते. त्यामुळे त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी अथवा काही द्रव पदार्थ प्यायले पाहिजेत.

3) केसांना नियमितपणे तेल लावावे – केसांना नियमितपणे तेल लावल्याने त्यांचे पोषण तर होतेच पण हे स्कॅल्पसाठी आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसांत केसांना नैसर्गिक तेल मिळणे खूप गरजेचे असते. नियमितपणे तेल लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते.

4) केस धुतल्यानंतर पूर्णपणे वाळवा – काही व्यक्ती केस धुतल्यानंतर ते तसेच सोडून देतात, ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच केस धुतल्यानंतर वाऱ्यावर किंवा पंख्याखाली नीट, पूर्णपणे वाळवावेत. मात्र केस टॉवेलने जोरजोरात पुसू नयेत, अन्यथा ते खराब होऊ शकतात. केस ओले असताना त्यांची मुळं कमकुवत असतात, त्यामुळे ते जोरात पुसले अथवा झटकले तर ते तुटू अथवा गळू शकतात. म्हणून केस धुतल्यावर योग्यप्रकारे काळजी घेऊन ते वाळवावेत.

5) आठवड्यात 1 किंवा 2 पेक्षा अधिक वेळेस केस धुवू नयेत – शांपूच्या जास्त वापराने आपल्या स्कॅल्पवरील संरक्षणात्मक तेलाचा थर हटू शकतो. त्यामुळेच एका आठवड्यात एक किंवा दोनपेक्षा अधिक वेळेस शांपूने केस धुवू नयेत. तसेच केस धुण्यापूर्वी पुरेसे तेल लावावे. सौम्य शांपूचा वापर करावा.

6) कंडीशनर वापरायला विसरू नका – तुमचे केस मॉयश्चराइज करण्यासाठी आणि केसांच्या सर्वात बाहेरील थराचे संरक्षण करण्यासाठी केस शांपूने धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करणे आवश्यक महत्वपूर्ण ठरते. यामुळे केस चमकदार आणि मऊ तर होतातच पण त्यामध्ये गुंता होत नाही व ते जास्त तुटतही नाहीत. त्यामुळे केस धुतल्यानंतर कंडीशनर अवश्य वापरावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम