तुरीने गाठला प्रतिक्विंटल 10 हजारांचा टप्पा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ जुलै २०२३ | देशात मोठ्या प्रमाणात वाढती महागाई सुरु असून गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे भारताला विदेशातून तूर मागवावी लागली असतांना आता विदेशातही पाहिजे तसे उत्पादन नाही. यामुळे तुरीचे दर वाढत आहे. आता साठा नियंत्रणाचे आदेश आहेत. तहसील विभागाने साठा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मात्र, गोदामातही तुरीचा साठा नाही. परिणामी, येत्या दोन महिन्यात तुरीचे दर वधारण्याचे संकेत आहेत. सद्यःस्थितीत तुरीने प्रतिक्विंटल 10 हजारांचा टप्पा पार केला आहे.

यावर्षीच्या हंगामात तुरीचे क्षेत्र जेमतेम आहे. त्यातही अनेक ठिकाणी माकडांचा उपद्रव वाढला आहे. याशिवाय रानडुकरांनीही हैदोस घातला आहे. त्यामुळे लावलेली तूर नष्ट होत आहे. सोबतच सोयाबीनचे क्षेत्र कमी झाल्याने सोयाबीनमध्ये असलेले तुरीचे पीक कमी होण्याचा अंदाज आहे. मागणीच्या तुलनेत तुरीचा साठा अत्यल्प आहे. याशिवाय बाहेरील देशातूनही तुरीची मागणी झाली. मात्र, तूर उपलब्ध झाली नाही. आता केंद्र शासनाने तुरीचे दर कमी करण्यासाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तुरीचा हंगाम येण्यास वेळ आहे. बाजार समितीत शेतकर्‍याांकडून येणारी तूर संपली आहे. मोठ्या शेतकर्‍यांनी राखून ठेवलेली तूरच विक्रीला येत आहे. दररोज हजारो क्विंटल विक्रीला येणारी तूर आता दर दिवसाला 100 ते 200 क्विंटलच्या घरात आहे. पुढे ही आवक आणखी घटणार आहे. तूर उपलब्ध न झाल्याने पुढील काळात तुरीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा फायदा व्यापार्‍यांना होईल. या दरवाढीमुळे ज्यांच्याकडे तूर नाही अशा शेतकर्‍यांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम