तुषार गांधींचे मोठे भाष्य ; राहुल गांधींसोबत खंबीरपणे उभे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ ।  महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर मोठे भाष्य केले आहे. देशात सुरु असलेल्या राजकारणाबद्दल मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आता या घटनेला नवीन वळण लागण्याची देखील शक्यता आहे. राजकारणात राहुल यांच्या रूपाने आश्वासक आवाज, त्‍यांनी माफी मागू नये. अशी भूमिका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मांडली आहे. राहुल यांनी कोर्टात माफी मागितली नाही. मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटल्याने देशासह राज्यभरात घमसान माजले आहे.

दरम्यान, एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रत्यक्षपणे दाखवून दिले. राहुल गांधी यांनी कोर्टात माफी मागितली नाही. मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटले. माफी मागून संसदेत राहणे चांगले राहिले नसते का? असा सवाल उपस्थित केला असता. जर त्यांनी माफी मागितली असती तर जे बोलले ते सत्य नाही, हे सिद्ध झाले असते. राहुल यांच्या वक्तव्यात कोणत्या जातीचा अपमान किंवा त्यावर हल्ला करण्याचा उद्देश नव्हता. मला नाही वाटत ते जे काही बोलले यात कुणाविषयी घृणा होती.भाजप या वक्तव्याला जातीय रंग देऊ पाहतेय. ज्यांच्याविषयी बोलले त्यांनी काय केले, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जर राहुल गांधी मोठ्या कोर्टात दोषी ठरले तरी त्यांनी माफी मागावी, असे मला वाटत नाही. हे एक ऐतिहासिक तथ्य आहे की, सावरकरांनी माफी मागून स्वत:ची सुटका केली होती.

राहुल गांधींविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यामुळेच मी भारत जोडो यात्रेत गेलो होतो. गेल्या ४ ते ८ वर्षांबाबत बोलायचे झाले तर, केवळ एकच आश्वासक आवाज राजकारणात उठत असून तो राहुल गांधींचा आहे. त्यांनी स्वत:ला बदलले आहे. त्यांनी वेगळ्याप्रकारचे नेतृत्व करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. परंतु काँग्रेस नेतृत्वाला स्वत:ला सुधारावे लागेल. अशी खंतही तुषार गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम