ट्विटरचे सीईओ मस्क देणार राजीनामा ; समोर आले मोठे कारण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ डिसेंबर २०२२ ।  गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने उद्योजक इलॉन मस्क यांचे नाव सतत चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरची धुरा सांभाळल्यापासून अनेक बदल केले आहेत. मात्र त्यातच त्यांनी आपण ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांनी ट्विट करून अशी माहिती दिली.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, नोकरी घेण्याइतपत वेडा कोणी भेटला की मी सीईओ पदाचा राजीनामा देईन! त्यानंतर, मी फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमसोबत करेल, असंही ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मस्क यांनी मी ट्विटरच्या सीईओपदावर राहु की नको, असा पोल घेतला होता. त्यात ५७ टक्के लोकांनी पद सोडा अस मत नोंदवलं होतं.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मस्कच्या या निर्णयाविरोधात जगभरातून टीकेची झोड उठली होती. कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या निर्णयानंतर आता पुन्हा मस्क एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारील असल्याचे सांगितले जात आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम