ट्विटरचा मोठा निर्णय ; ४५ हजार खाती केले बंद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ देशात गेल्या काही दिवसाआधी ट्विटर काही काळ बंद पडलेले होते. त्यानंतर नेटकऱ्यानी सोशल मिडीयावर एलॉन मस्क यांना ट्रोल केले जात होते. तर नुकतेच मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशात 45 हजार 589 ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये मुलांचे लैंगिक शोषण, नग्नता आणि संबंधित पोस्ट केल्या जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच ही खाती 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान बंद करण्यात आली आहेत. ट्विटरने दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या 3035 खात्यांवरही कारवाई केली आहे. ट्विटरने भारतात एकूण 48 हजार 624 खात्यांवर बंदी घातली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या आणि भावना भडकवणाऱ्या पोस्टला आळा बसावा, या करता ट्विटरने हा निर्णय घेतला आहे.

 

ट्विटरने या महिन्याचा मासिक अहवाल जाहीर केला आहे. रिपोर्टमध्ये ट्विटरने म्हटले आहे की, ट्विटर यूजर्सकडून 755 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 121 यूआरएलवर कारवाई करण्यात आली आहे. यूजर्सने केलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय, आवश्यक प्रतिसाद देखील आम्ही तक्रारदारांना पाठवला आहे.

का ब्लॉक करण्यात आले खाते ?
मिळालेल्या माहितीनुसार, यात चुकीची माहिती असलेल्या बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेल्या व्हिडीओंचा समाविष्ट आहेत. तसेच यात धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच अशा व्हिडीओंमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे.
ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरकडून नवीन धोरणाची घोषणा केली होती. मस्क यांनी स्पष्ट केले होते की, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अजिबात विरोधात नाही, मात्र आता ट्विटरवर नकारात्मक आणि भडकाऊ ट्विट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. ट्विटरच्या नवीन धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु अशा प्रकारच्या ट्विटचे स्वातंत्र्य नाही. मस्क म्हणाले, नकारात्मक/द्वेषपूर्ण ट्विट जास्तीत जास्त डीबूस्ट केले जातील आणि डिमोनेटाईझ केली जाईल. अशा ट्विट्सना Twitter वर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे साधन उपलब्ध असणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम