दुचाकीच्या डिक्कीत धारदार शस्त्र घेवून फिरणारे दोघे जेरबंद
दुचाकीच्या डिक्कीत धारदार शस्त्र घेवून फिरणारे दोघे ताब्यात
जळगाव प्रतिनिधी एमआयडीसी पोलिसांनी दुचाकीच्या डिक्कीत धारदार चाकू घेवून फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार चाकू हस्तगत करण्यात आले. ही कारवाई दि. २३ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ परिसरात केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून दि. २३ रोजी पहाटेच्या सुमारास संशयित जवान अहदम सईद शेख (वय २६, रा. बुशरा हॉटेल गरीब नवाझ नगर, धुळे) व साकीर अन्वर खाटीक (वय ४४, रा. हजार खोली मुस्लिम नगर, धुळे) हे दोघ (जीजे ०५, जेके, ७८९८) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्या वाहनाची झडाझडती घेतली असता, त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून धारदार चाकू हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम