दोन किलो टोमॅटोसाठी ठेवले दोन मुल गहाण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ जुलै २०२३ ।  देशात वाढती महागाई सुरु असतांना अनेक घटना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या नियमित समजत असतात पण जी घटना आता समोर आली आहे. ती थक्क करणारी आहे. हि घटना ओडिशातील कटकमध्ये टोमॅटोसाठी दोन मुले गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . एका ग्राहकाने दोन मुलांना टोमॅटोच्या दुकानात बसवले आणि टोमॅटो घेऊन पळ काढला. ही घटना कटकच्या छत्रबाजार भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदू कटकच्या छत्रबाजार भाजी मंडईत दररोजच्या प्रमाणे भाजीचे दुकान मांडून बसला होता. त्यामुळे या व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांसह ग्राहक असल्याचे भासवत दुकान गाठले. त्याने दुकानदार नंदू याच्याशी टोमॅटोसाठी सौदा केला. टोमॅटोचा घाऊक भाव 130 रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर दोन किलो टोमॅटो घेतल्यावर दुकानदाराला सांगितले की मला अजून 10 किलो घ्यायचे आहेत. मी माझी पर्स गाडीतच विसरलो. आमची मुलं टोमॅटो घेतील तोपर्यंत मी कारमधून पर्स घेऊन येईन. असे बोलून तो निघून गेला. इकडे मुलं आणि दुकानदार दोघेही त्याची वाट बघत बसले.

मात्र, बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने दुकानदार नंदूला संशय आला. त्यांनी दोन्ही मुलांची विचारपूस केली. चौकशी केल्यानंतर तो फसवणुकीचा बळी ठरल्याचे समोर आले. नंदूने दोन्ही मुलांना त्याच्या दुकानात बसवले. तोपर्यंत आजूबाजूचे दुकानदारही त्याच्यापर्यंत पोहोचले. लोकांना पाहताच दोन्ही अल्पवयीन मुले रडू लागली. बारंग पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नंदनकानन येथील रहिवासी असल्याचे दोघांनी सांगितले. बबलू बारीक आणि एस्कर महंती अशी या मुलांची नावे आहेत. या दोन्ही मुलांनी सांगितले की, त्यांना येथे आणणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखत नाही. मुलांनी सांगितल्यानुसार, त्या व्यक्तीने दोघांना काम करून देण्याच्या बहाण्याने आणले होते आणि 300 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कटक येथे पोहोचल्यानंतर त्यांनी दोघांनाही छतरबाजार भाजी मंडईत आणले आणि भाजी विक्रेत्याला दोन किलो टोमॅटो आणि पाच कच्ची केळी घेऊन गाडीत ठेवण्यास सांगून ते निघून गेले. दोघेही त्याच्या परतण्याची वाट पाहत होते, पण तो परत आलाच नाही. तेथे दुकानदाराने या दोन्ही मुलांना पकडून आपल्या बाजूला बसवले. मात्र, याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. काही तासांनंतर व्यापारी नंदूने आपले नुकसान मान्य करून दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम