ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रीणीना केली अटक !

बातमी शेअर करा...

बातमीदार |१९  ऑक्टोबर २०२३

राज्यात ड्रग्ज तस्करी प्रकरणात ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. तर आता पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिला ललित पाटील याच्या मैत्रिणी असल्याची माहिती आहे. ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे पोलिस देखील या प्रकरणाचा आणखी कसून तपास करत आहेत. त्यानुसार त्यांनी कालच नाशिकमधून प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम या दोन्ही महिलांना अटक केली आहे. ललित पाटील हा ससूनमधून पळाल्यानंतर तो आधी नाशिकला गेला होता. तो नाशिकला गेला तेव्हा त्याला या महिलांनी पैसै दिले तसेच त्यांची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

ललित पाटीलचे जमा झालेले पैसे आणि त्याचे सोने देखील या दोन महिलांकडे होते अशी माहिती पोलिसांकडे आहे. आज या महिलांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ललित पाटील हा फरार असल्याच्या काळात देखील सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. ड्रग्सच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून या दोन्ही महिलांना अटक केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम