मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑगस्ट २०२२ । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ (मुंबई दिशेने) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीतर्फे आज, शुक्रवारी (दि. २६ ऑगस्ट) करण्यात येणार असून वाहन चालवताना नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा अपघात वगरे होऊ नये म्हणून दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक किवळे ते देहु रोड मार्गे सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव टोल नाकामार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

या वेळात द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या कडून करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम