उद्धव आता टोमणेबाज म्हणून नावारुपाला ; भाजपची जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपचे चांगलेच तोंड सुख घेत होते. आज मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब हिंदू शेर म्हणून लोकप्रिय होते. याऊलट उद्धव ठाकरे टोमणेबाज म्हणून नावारुपाला आलेत, असे ते म्हणालेत.

भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे की, स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत पाकिस्तान धार्जिणे, देशविरोधी तत्वांची मुंबईत येण्याची हिंमत होत नसायची. पण आता दुर्दैवाने बाळासाहेब आपल्यात नाहीत, तर मुंबईत सत्तेच्या हव्यासाने पाकिस्तान धार्जिणे, देशविरोधी तत्व मुंबईकडे निघाली. बाळासाहेबांचा वारस असलेल्या उद्धव ठाकरेंना असा काही सत्तामोह झालाय की, बाळासाहेब ज्या देशविघातक तत्वांविरोधात आयुष्यभर लढले. त्यांच्यासाठी त्यांचाच पुत्र उद्धव पायघड्या अंथरत आहे. बाळासाहेब हिंदू शेर म्हणून देशभर लोकप्रिय होते तर, “उद्धव” टोमणेबाज म्हणून नावारूपाला आलेत, असे भाजपने म्हटले आहे.

भाजपने आपला हल्ला अधिक धारदार करताना पुढे म्हटले आहे की, अखंड भारताला कलंक असलेल्या आर्टिकल 370 चे समर्थन करणारे फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती उद्धव ठाकरेंसाठी विशेष अतिथी झालेत. ज्या ज्या नेत्यांना पाकिस्तानबद्दल विशेष प्रेम आहे. ते सर्व घमंडिया गठबंधनमध्ये सामील झालेत आणि उद्धव ठाकरे व शरद पवार त्यांचे सेवेकरी झालेत.
स्वर्गीय बाळासाहेब नेहमी सांगायचे की ज्या दिवशी त्यांना त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा करण्याची वेळ येईल, तेव्हा ते त्यांचा पक्ष कायमचा बंद करतील. पण सध्या घमंडिया गठबंधनची अशी काही झापडे त्यांच्या पुत्राच्या डोळ्यावर चढली आहेत की, उद्धव ठाकरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेऊ लागलेत, असे सत्ताधारी भाजपने म्हटले आहे.
मराठी जनतेने बाळासाहेबांनी मुंबईतून देशबंदची हाक देऊन, संपूर्ण देश बंद होताना पाहिलाय. अगदी पाकिस्तानचा विरोध करायला खेळपट्ट्या उखडणारे शिवसैनिक पाहिलेत. आता मराठी जनता “देशविरोधी लोकांची” हुजरेगिरी करणारे, “सोनिया” गांधीसमोर वाकणारे उद्धव ठाकरे पाहत आहेत, हेच काय दुर्दैव, असेही भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम