उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेनं, संयमीपणे शिवसेना पुढे आणली : जाधव 

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ ।  नवी मुंबईत कार्यकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधात उद्धव ठाकरे गटानं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसेनेचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसेना दोन पावलं पुढे नेली, असं विधान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. यावेळी जाधव यांनी भाषण केलं यावेळी ते बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेनं, संयमीपणे आणि खूप नियोजनबद्धरित्या बाळासाहेबांपेक्षा शिवसेना दोन पावलं पुढं नेण्याचं काम केलं. पण सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल समाजात शंका-कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं त्यासाठी वेगवेगळ्या पतळीवर टीकाटिप्पणी करण्याचं काम सातत्यानं सुरु होतं. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव गोठवण्याचं काम झालं.

पण आता मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण निशाणी हे याच्या नावानं मोठे झाले त्यांनी ते गोठवण्याचं पाप केलं. पण नियतीनं तुमच्यासाठी नवं दार उघडलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं जे काही शिवसेनेनं होईल ते उद्धव ठाकरेंचं असेल, अशा करता नवीन संधी तुम्हाला दिलेली आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम