उद्धव ठाकरे गट हा काँग्रेसमध्ये एकरुप ; भाजपची जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ सप्टेंबर २०२३ | देशभरातील सर्वच विरोधकांची आज इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडत असून काही वेळातच पत्रकार परिषदही घेतली जाणार आहे. आज सकाळच्या सुमारास इंडिया आघाडीचं फोटोसेशन पार पडलं. यातला एक फोटो हा चांगलंच लक्ष वेधून घेतो आहे. ज्यावर भाजपाने टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे गट हा काँग्रेसमध्ये एकरुप झाल्याचं म्हटलं आहे.

इंडिया आघाडीत जे २६ पक्ष आहेत त्यांचा हा फोटो आहे. या फोटोतल्या पहिल्या रांगेत उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या मधोमध उभे आहेत. तर त्यांच्या एका बाजूला ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि अखिलेश यादव आहेत. हा फोटो काँग्रेसने ट्विट केला आहे. ज्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देऊन उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

 

 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे कायमच सोनिया गांधींवर टीका करत आलेत. उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींबरोबरचा फोटो पाहून मात्र ही शिवसेना नाही तर सत्तेसाठी सत्व गमावलेला उद्धव ठाकरे गट आहे जो काँग्रेस मध्ये एकरुप झाल्यासारखा वाटतो. असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. इंडिया आघाडी आता देशात आणि महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच महागाई कमी होते आहे कारण भाजपा इंडिया आघाडीला घाबरली आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही भाजपाने समाचार घेतला होता. आता आज जे फोटोसेशन पार पडलं त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सत्तेसाठी सत्व गमावलेला उद्धव ठाकरे गट असं म्हणत उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम