बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला फोडल्यानंतर अजित पवारांनी थेट आपल्याच राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे देखील आता राजकीय दौरा करीत आहे. ठाकरे आता बंडखोरीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरले आहे त्यामुळे पक्षात होणारी बंडखोरी थांबणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे आज सकाळीच मुंबईहून रवाना झाला आहेत. उद्धव ठाकरे या दौऱ्यात विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहे. फुटीनंतर पक्ष मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांना आपल्याकडे रोखून धरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर सहमती झाली होती. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा होत असल्याने याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

शरद पवार यांनी नाशिकमधून आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर, उद्धव ठाकरे हे आज विदर्भापासून आपल्या दौऱ्याला सुरूवात करत आहेत. महाराष्ट्राच्या दोन विरोधी टोकांकडून दौऱ्याला सुरूवात करत बंडखोरांविरोधात जनमत निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांनीही जय्यत तयारी केली आहे.

बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. दुपारी दोन वाजता ते दारव्हा-दिग्रस येथे दाखल होणार आहेत. या दौऱ्यातून शिंदे गटात गेलेले आमदार संजय राठोड यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्यात आला. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या फुटीवर काय भाष्य करतात, याकडे लक्ष असणार आहे. या दौऱ्यात शिवसैनिकांशी संवाद साधतानाच ते शिंदे गट आणि भाजपचा जोरदार शब्दांत समाचार घेण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम