परवानगी नसतांना उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ ।  राज्यात सुरु असलेल्या बारसूच्या आंदोलकाना भेटण्यासाठी आज उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या याठिकाणी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

आंदोलकांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूचा दौरा करणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. प्रशासनाने रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र सभा घेता येणार नाही. उद्धव ठाकरे आज बारसूत सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी परिसरातील विरोधकांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. या दौऱ्यात विरोधकांसोबतच रिफायनरीचे समर्थकही ठाकरेंची भेट घेणार आहेत. समर्थक संमतीपत्रे सादर करणार आहेत.

बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी तिथे 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी पत्र दिले होते. मात्र, तिथे लाठीमार करा असे पत्र दिले होते का? बारसूमध्ये अत्याचार करून प्रकल्प करा, असे पत्र दिले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची सांगितले जात आहे.

रत्नागिरीतल्या बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्यात. त्यामुळे राजकीय गोटात महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी बारसू प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले. मात्र, ठाकरे गटाने या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम