उद्या जळगावात उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून शहरातील दोन पुतळ्याच्या लोकार्पणासाठी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे येत असल्याने शिंदेंच्या शिवसेना व ठाकरे गटात आता राजकारण तापलं आहे. यात आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेवून उद्याच छत्रपती शिवाजी महाराज यांचा व मनपातील सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यांच्या लोकार्पण होणार असल्याचे देखील सांगितले.

संजय सावंत म्हणाले कि, पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा व मनपातील सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यांच्या लोकार्पणासाठी सर्व परवानगी घेतलेल्या आहेत. राजशिष्टाराच्या सूचनांचे पालन करुन कोनशीला तयार केली आहे. त्यामुळे रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या हस्ते दोन्ही महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणारच असल्याची ठाम भूमिका उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जाहीर केली. प्रशासन व सर्व राजकीय पक्षांनी पुतळा अनावरणाचे राजकारण न करता या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पुतळ्यांच्या अनावरणाबाबत आयुक्तांकडे महापौर जयश्री महाजन यांच्या माध्यमातून केलेला आहे. आयुक्तांकडून राजशिष्टाचाराच्या अनुषंगाने ज्या बाबी करणे गरजेचे आहे. त्याबाबतच्या सूचनांचीही पूर्तता केली आहे. सर्व नियोजीत असताना पुतळ्यांच्या लोकापर्णाला गालबोट लागण्यासाठी जाणून बुजून काही पत्र काढण्यात आली. तीन आठवड्यापूर्वी या कार्यक्रमाबाबत नियोजन होते. ७ सप्टेंबर रोजी मंत्रालयात पत्र जाते. त्या अनुषंगाने ८ सप्टंेंबर रोजी प्रोटोकॉलबाबत आदेश काढले जातात. जळगाववासीयांसाठी हा मोठा क्षण आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे लोकार्पण होत आहे. हा कार्यक्रम होवू द्यायचा नव्हता तर आयुक्तांनी सरदार वल्लभभाई यांचा पुतळा महापौरांकडे द्यायलाच नको होता. तो पुतळा चबुतऱ्यावर ठेवण्यात आला. महाराजांच्या पुतळा धुळ्यावरुन आणताणा काही लोकांनी राजकीय हस्तक्षेप करुन पुतळा जळगाव शहरात येवू नये म्हणून फोन केले. आम्ही सांमजस्याची भूमिका घेतली. सर्व परवानगी पूर्ण होईपर्यंत पुतळा एरंडोल येथे ठेवला. वाजत गाजत पुतळ्याचे जळगाव शहरात आगमण केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम