केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एम्समध्ये दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ डिसेंबर २०२२ । देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची काल 98 वी जयंती होती. त्यानिमित्त दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ समाधीवर जात विविध नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही वाजपेयींना पुष्प अर्पण केले होते. तामिळनाडूतील एका विद्यापीठातील दीक्षांत समारंभालाही निर्मला सीतारामन यांनी हजेरी लावली होती. इथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं.

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. निर्मला सीतारामन यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना नक्की काय झालंय? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना नक्की काय झालंय, कशासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, हे कळू शकलेलं नाही. पोटाच्या विकारामुळं सितारामन रूग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती आहे. दिल्लीच्या AIIMS त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम