बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मागणी

बातमी शेअर करा...

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना भेटून बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मूळ मार्गच वापरण्याचे आदेश देण्याची मागणी केली. तसेच सद्यस्थितीत या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती तत्काळ सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्याची विनंती केली.

रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले असून, या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाबाबत राजपत्र काढण्यात आले आहे. रस्ता मुक्ताईनगर तालुक्यातून जाण्याच्या प्रस्तावामुळे रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रस्त्याचा पूर्वीचा मार्गच वापरण्याची मागणी केली आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मंजूर केलेला ६१ कोटी रुपयांचा निधी असून, त्याचे काम संथ गतीने सुरू आहे किंवा थांबले आहे.

रस्त्याची दुरुस्ती त्वरित सुरू न झाल्यास ठेकेदार बदलण्याची आवश्यकता असल्याचे रक्षाताई खडसे यांनी गडकरी यांना सांगितले. मंत्री नितीन गडकरी यांनी या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम