‘शिवतीर्थ’वर केद्रीय मंत्री राणे दाखल ; राजकीय चर्चेला उधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. भाजप नेते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. आज नुकतीच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्व आहे.

काहीवेळा आधी नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. तिथे राज ठाकरे आणि त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीवेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘शिवतीर्थ’च्या गॅलरीत पाहायला मिळाले. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक आहे. यात कौटुंबिक मुद्यावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. ही भेट वैयक्तिक कारणासाठी घेण्यात येतेय, असं जरी सांगण्यात येत असेल तरी दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणं सहाजिक आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाला टक्कर द्यायची असेल तर तितकंच राजकीय बळ लावावं लागणार आहे. त्यामुळे युतीत विविध पक्षांचा समावेश करण्यासाठी हालचाली वाढत असल्याचं बोललं जात आहे. अशात राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीला विशेष महत्व आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम