
केंद्रीय मंत्री शहा दोन दिवसीय राज्य दौऱ्यावर !
दै. बातमीदार । १० जून २०२३ । देशातील भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्रच्या दौऱ्यावर आहेत. वेळापत्रकानुसार शाह शनिवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबादला पोहोचतील. येथे ते अनेक बैैठकांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी ते येथून महाराष्ट्राकडे रवाना होतील. गृहमंत्री नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
नांदेडमध्ये भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात शहा यांच्या रॅलीने होणार आहे. यासोबतच मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेणार आहेत. नांदेड हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. गुरु गोविंद सिंग यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ नांदेडमध्ये घालवला होता, त्यामुळे हे ठिकाण शीखांसाठीही खास आहे. अमित शाह नांदेड येथे गुरुद्वारा समितीच्या सदस्यांचीही बैठक घेणार आहेत. अमित शहा शनिवारी रात्री चेन्नईला पोहोचतील. 11 जून रोजी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. यानंतर शाह तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये सभा घेणार आहेत. यानंतर मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप तामिळनाडूमध्ये 66 जाहीर सभा घेणार आहे, ज्या महिनाभर चालणार आहेत. 11 जून रोजी संध्याकाळी अमित शाह आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे जाणार आहेत. तेथेही त्यांची जाहीर सभा होणार आहे. यानंतर शाह दिल्लीला परततील.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम