उर्फी प्रकरण तापणार : चित्रा वाघ यांना नोटीस !
दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ राज्यात सोशल मिडीयावर आपल्या कपड्यावर नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेदवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केल्यानंतर तिच्यावर कारवाईसाठी सुद्धा पुढे आल्या होत्या. पण आता हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येवून ठेपले आहे.
५ रोजी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो.
खोटी माहिती चित्रा वाघ यांनी काल दिली.
तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही.
दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती.
चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली.
दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस
१९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा.
अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल.
चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावाच यावेळी सादर केला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं. या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमाणूस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचं आयोगाने नमूद केलं होतं. मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसं वाटत नाही? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम