
उर्फीने रोहित शेट्टीची ऑफर नाकारली !
दै. बातमीदार । १० मार्च २०२३ । बॉलीवूडमधील दिग्दर्शक रोहित शेट्टीचे अनेक चित्रपट हिट आहे तर काही चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक देखील केलेले आहेत. अशा चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा रोहित शेट्टी नेहमीच सोशल मिडीयावर आपल्या खाजगी आयुष्य्साठी चर्चेत असतो. यावेळी त्याने उर्फी जावेदला ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या पर्वासाठी ऑफर दिली होती.
छोट्या पडद्यावरील साहसी कार्यक्रम ‘खतरों के खिलाडी’ हा आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वात उर्फी जावेद सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये उर्फी जावेद सहभागी होणार नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमासाठी निर्मात्यांनी उर्फी जावेदला विचारणा केली होती. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उर्फी उत्सुक होती. पण ‘खतरों के खिलाडी’आधी उर्फीला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली होती आणि त्या प्रोजेक्टसाठी उर्फीने होकार दिला होता. त्यामुळे आता उर्फीने ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमासाठी नकार दिला आहे. सध्या नव्या प्रोजेक्टसाठी उर्फी उत्सुक असून लवकरच ती यासंदर्भात घोषणा करेल.
‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं आजवर परदेशात शूटिंग झालं आहे. या पर्वासाठी देखील रोहित शेट्टी स्पर्धकांना घेऊन परदेशात जाणार असल्याची चर्चा आहे. येत्या 17 जुलैला ‘खतरों के खिलाडी 13’चा प्रीमियर होणार असल्याचा अंदाज आहे. ‘खतरों के खिलाडी 13’साठी अंकित गुप्ता, अर्चना गौतम, शिव ठाकरे, हर्षद चोप्रा, एमसी स्टॅन आणि नकुल मेहताला विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात अनेक दर्जेदार स्पर्धक सहभागी होणार आहेत. एकापेक्षा एक असणाऱ्या स्पर्धकांची खेळी पाहायला चाहतेदेखील उत्सुक आहेत. दुसरीकडे उर्फी जावेद ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम