उर्फीची नवीन फॅशन पुन्हा चर्चेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  सोशल मिडीयावर शेकडो व्हिडीओ असलेल्या उर्फी जावेद नेहमीच आपल्या वेगळ्या लुकमुळे चर्चेत येत असते. ती आता सुद्धा आपल्या हटके लूकने चर्चेत आलेली आहे. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे थेट टीका केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही. वाद आणि उर्फी जावेद हे समीकरण देखील काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे.

उर्फी जावेद हिला अनेकदा थेट तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या गेल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. इतकेच नाही तर उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करते. उर्फी जावेद हिची दररोजची कमाई ही 8 ते 9 लाखांच्या घरात आहे. उर्फी जावेद हिने फॅशनमुळे मोठी कमाई करते. सोशल मीडियावरही अनेक जाहिराती करताना उर्फी जावेद ही दिसते.

अनेकदा तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. इतकेच नाही तर लोक तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करताना देखील कायमच दिसतात. मात्र, उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला मोठे प्रेम मिळताना दिसते. उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. इतकेच काय तर उर्फी दिसली की, लोक तिच्या भोवती गर्दी देखील करतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम