
हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक पीर अ रज्जाक शाह बाबानचा उर्स यात्रा ४ अगस्तला
अमळनेर(आबिद शेख) अमळनेर तालुक्यातील धार येथे हजरत सैय्यद अब्दु रज्जाक शाह पिरबाबा यांच्या सालाबादप्रमाणे उर्स यात्रा दिनांक ४ अगस्त गुरूवार रोजी होणार आहेत
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या धार ता अमळनेर जि जळगांव येथील पिरबाबांची दर्गा येथे हिंदु मुस्लिम समाजाच्या दररोज शेकडो भाविक येतात तसेच उर्स यात्रेसाठी गुजरात, मध्य प्रदेश,व राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात इसलामी महिन्याच्या प्रथम महिना मोहरमच्या पाच तारखेला दर वर्षी उर्स यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो मागील दोन वर्षांपासून कोरोना असल्याने यात्रा रद्द करण्यात आली होती सालाबादप्रमाणे यंदा यात्रेचे कार्यक्रम असे रहिल दिनांक ३ अगस्त बुधवारी रोजी संदल तर दिनांक ४ अगस्त गुरूवार रोजी उर्स यात्रा होणार आहेत उर्स यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी चारचाकी, मोटरसायकल, रिक्षा, बस व आदि वाहने येणाऱ्या जाणाऱ्यानी सावकाशपणे यावे एक दुसर्यांना सहकार्य करावे गर्दीत लहान मुलांना सांभाळावे असे आवाहन हजरत सैय्यद अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा धार शरीफ ता अमळनेर जिल्हा जळगांव येथील मुजावर पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम