‘या’ तेलाचा करा असा उपयोग ; राहणार सुंदर त्वचा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ जुलै २०२३ ।  प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आपण सुंदर असावे व त्यातल्या त्यात आपले आरोग्य देखील उत्तम असावे असे नेहमी वाटत असते पण काहीच्या आयुष्यात तसे काही नसते कुठल्यातरी आजाराने प्रत्येक व्यक्ती त्रस्त असते पण मानवी शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे नाभी हि असते. जेव्हा नाभी निरोगी असते तेव्हा आपले शरीर देखील निरोगी राहते. बऱ्याचदा अनेकजण पोटात दुखत असल्यास नाभीमध्ये तेल सोडतात. यामुळे पोट दुखीतून आराम मिळतो. मात्र, नाभीवर तेल घातल्याने फक्त पोटदूखीच नाही तर इतरही समस्यांवर तुम्ही मात करता येते. शिवाय यामुळे चेहऱ्यावर देखील ग्लो येतो आणि हाडं देखील मजबूत होतात.

नाभीमध्ये घाला ‘हे’ तेल

मोहरीचे तेल
मोहरीचे तेल खूप औषध आहे. या तेलाचे काही थेंब नाभीमध्ये टाकल्याने आजार दूर होतात. यामुळे त्वचा देखील तजेलदार आणि टवटवीत राहते.

कडुलिंबाचे तेल
बऱ्याच जणांच्या अंगाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अंगाला खाज सुटते. अशावेळी कडुलिंबाचे तेल नाभीमध्ये टाकून त्यावर हलक्या हाताने मसाज केल्याने अंगाला होणारी खाज कमी होते.

बदामाचे तेल
बदामाचे तेल नाभीमध्ये टाकून त्यांनी मसाज केल्यास चेहरा टवटवीत आणि सुंदर दिसतो.

ऑलिव्ह ऑईल
जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास ऑलिव्ह ऑईलचा तुम्ही वापर करु शकता. रात्री झोपेच्या आधी नाभीमध्ये तेल टाका, यामुळे चांगला फायदा होईल.

गायीचे तूप
गायीच्या तुपाचा धार्मिक विधीकरता वापर केला जातो. तसेच हे तूप नाभीमध्ये घालून आपण चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग देखील दूर करु शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम