क्रेडिट कार्ड वापरत आहात ‘ही’ घ्या सावधगिरी !
बातमीदार | १३ ऑगस्ट २०२३ | तुमचा मोबाईल नेहमी वाजत असतो. पण सध्या अनेक बँक तुम्हाला फोन करीत असतात. व तुम्हाला क्रेडिट कार्डबाबत मोठ्या ऑफर देखील देत असतात. ज्यांच्याकडे हे क्रेडिट कार्ड असेल त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. परंतु बऱ्याच वेळा प्रथमच क्रेडिट कार्ड वापरणारे नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते किंवा कर्जाच्या जाळ्यात अडकावे लागते. तुम्ही जर प्रथमच क्रेडिट कार्ड घेतले असेल तर कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊ या..
मिनिमम पेमेंट
जेव्हा जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल तयार होते. वापरकर्त्याला दोन पेमेंट पर्याय दिले जातात. पहिला पर्याय पूर्ण पेमेंट आहे, तर दुसरा पर्याय किमान पेमेंट आहे. बर्याच वेळा असे दिसून येते की बर्याच वेळा युजर किमान पेमेंटचा पर्याय निवडतात. आणि त्याच्या बिलावर भारी व्याज आकारले जाऊ लागते आणि तो कर्जाच्या जाळ्यात अडकतो. यामुळे क्रेडिट कार्डचे बिल नेहमीच पूर्ण भरत जाणे केव्हाही चांगले.
क्रेडिट कार्ड लिमिट पूर्ण वापरू नका
जे पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत असतात ते बऱ्याचदा पूर्ण क्रेडिट मर्यादेचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअरही घसरतो. नेहमी क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त 30 ते 40 टक्के वापरा, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील चांगला राहतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम