दै. बातमीदार । ३ नोव्हेबर २०२२ राज्यात प्रसिद्ध असलेला वडापाव सुद्धा आता महागणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. महाराष्ट्र असो की मुंबई प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा वडापाव आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे. मुंबईच्या लोकांचा जर सर्वांत जास्त आवडता खाद्यपदार्थ कुठला असेल तर तो नक्कीच वडापाव हे नाव समोर येणार. साधारणतः १० रुपयांपासून विकल्या जाणाऱ्या आणि भुकेला साथ देणाऱ्या वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. सध्या हाच वडापाव एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय, ते कारण म्हणजे वडापाव महागणार. वडापाव महागण्यामागे एक मोठं कारण समोर आलंय.
पावाच्या दरात वाढ झाल्याने आता वडापावचा भाव वाढणार आहे. पावसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पाव बनवण्यासाठी लागलेला कच्चा माल महागल्याने पावचे दर वाढणार आहे. त्यामुळेच याचा परिणाम थेट वडापाववर पडणार.
आतापर्यंत पावाचा दर साधारणत: २ रुपये प्रति पाव असा होता. यात उत्पादन खर्च दीड रुपया होता. मात्र आता उत्पादन खर्चच प्रति पाव २ रुपये झाला त्यामुळे पावाची किंमत वाढली. आता ३ रुपयांपर्यंत पावाची किंमत वाढविण्यात आली आहे. सहा पावांची लादी आता १२ ऐवजी १६ रुपयां मिळणार असून विक्रेते आता ही लादी २२ ते २४ रुपयांना विकू शकतात. जर असे झाले तर वडापावचे भाव सुद्धा वाढणार.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम