व्हॅलेंटाईन डे सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचे दर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ फेब्रुवारी २०२३ । देशात आज व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. अनेक प्रियकर आपल्या प्रेयसीला सोण्याच्या दागिन्याची भेट देणार आहे. जे तरूण आपल्या प्रेयसीला सोने किवा चांदीचे दागिने भेट देणार असतील त्याच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय तेजी दिसून आली होती मात्र आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
आज व्हॅलेंटाईन दिवस असल्याने सोने चांदीच्या दरातील घसरण सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 57,230 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 700 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 58,210 रुपये

दिल्ली – 57,390 रुपये

हैदराबाद -57,240 रुपये

कोलकत्ता – 57,240 रुपये

लखनऊ – 57,390 रुपये

मुंबई – 57,240 रुपये

नागपूर – 57,240 रुपये

पूणे – 57,240 रुपये

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम