जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी वामन मेश्राम करणार इव्हीएम भांडाफोड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । निवडणूक’ हे लोकशाहीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे.मात्र इव्हीएम मशीन मुळे निवडणुकीला काहीही अर्थ उरलेला नसून मताची किमत शून्य करूनव र्तमान सरकार केवळ इव्हीएम च्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये निवडणुका जिंकत असून त्या पाशवी शक्तीच्या बळावर आणि झालेली आहे. आणि भारतीय लोकशाही प्रचंड मोठ्या संकटात आलेली आहे. लोकशाहीचा गळा आवळला जात आहे.या इव्हीएम च्या विरोधामध्ये देशभरात तीव्र संताप आहे.मात्र कुठलाही राजकीय पक्ष त्याविरोधात ठाम भूमिका घेऊन उभा राहत नाही.हे लक्षात घेऊन लोकशाहीआणि संविधान वाचविण्यासाठी भारत मुक्ति मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांति मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक मा.वामन मेश्राम यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशीइव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा (पार्ट-२) सुरुवात केलेली आहे. दिनांक ३ मार्च शुक्रवार रोजी या यात्रेचे जळगाव जिल्ह्यात आगमन होते आहे.ही परिवर्तन यात्रा धुळ्याहून जळगाव जिल्ह्यातील /अमळनेर /धरणगाव जळगाव मार्गे जामनेर येथे जाईल व येथे सायंकाळी ६:०० वाजता जुन्या पं.स समोर,वाकी रोड,जामनेर येथेतिचे सभेत रुपांतर होईल.

या सभेचे अध्यक्ष वामन मेश्राम असतील. तर रोहिणीताई खडसे या सभेच्या उद्घाटक आहेत. ॲड.मनिषा देशमुख, नितीन देशमुख, यु.डी.पाटील, राजेंद्र खरे, डॉ.प्रशांत पाटील हे मान्यवर प्रमुख वक्ते आहेत. यावेळी परिवर्तन यात्रेतील मुद्दे १)ईव्हीएमच्या गडबडीमध्ये कॉग्रेस व बीजेपीचा सहभाग आहे.हे साधार सिद्ध करून त्याविरोधात जनमानस तयार करणे. २) ईव्हीएम मशिनमुळे लोकशाहीची हत्या होत आहे.लोकशाही वाचविण्यासाठी ही परिवर्तन यात्रा आहे. ३) खाजगीकरणामुळे एस.एसी/एस.टी./ओबीसीं आणि अल्पसंख्यांकांचा रोजगार संपला.खाजगीकरणामुळे सरकारी उद्योग उद्योगपतींना कवडीमोल भावात दिले.या विरोधात ही परिवर्तन यात्रा आहे. ४)५२% ओबीसी समाजाची जनगणना केंद्र सरकारने करावी. ५)देश, संविधान व लोकशाहीला वाचविण्यासाठी ही परिवर्तन यात्रा आहे.

जळगाव शहर व तालुक्यातील बहुजन नागरिकांतर्फ आकाशवाणी चौक जळगाव येथे दु.ठीक १ :०० वाजता वामन मेश्राम यांंचे भव्य स्वागत केले जाणार आहे.तरी बहुजन समाजातील सर्व नागरिकांना आकाशवाणी चौकात वेळेत जमण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा,जळगाव शहर व तालुका युनिट तर्फे केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम