वंचित बहुजन आघाडी येणार महाविकास आघाडीत ; आंबेडकरांचे सूचक विधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । वंचित बहुजन आघाडी कुणासोबत यावर गेल्या आठवद्यापासून राज्यात राजकीय चर्चेला उधान असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती त्यामुळे ठाकरे गटाच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आंबेडकर यांनी विरोध केल्याने पुन्हा शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरु झाली होती. शिवसेना आणि वंचित बहुजन यांची युती झाल्याची चर्चा होती मात्र अजून पर्यंत अधिकृत जाहीर करण्यात आलं नाही. मात्र याची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्यास वंचित सकारात्मक होती मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र आता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहिजे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

ते म्हणाले आम्ही दोन्ही पक्षांचे युतीत स्वागत करू” त्यामुळे आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. युतीच्या घोषणेचा चेंडू प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गोटात सोपवला आहे. दरम्यान आगामी काळात महाविकास आघाडीत अजून एका मोठ्या पक्षाचा प्रवेश होणार असल्याचे चित्र समोर आलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम