
स्मशानभूमी प्रश्न न सुटल्यास वंजारी खुर्द ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा
पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील वंजारी खुर्द या गावाला स्मशानभूमी किंवा त्यासाठी नियोजित जागा नाही त्यामुळे ही समस्या दिनांक २४ पर्यंत सोडविली नाही तर दिनांक २५ रोजी आत्मदहन करु असा इशारा वंजारी येथील गावकऱ्यांनी दिला आहे.
राजपूत करणी सेनेचे कोर कमिटी राज्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह वंजारी चे ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव, गट विकास अधिकारी पारोळा, पोलीस निरीक्षक पारोळा यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत गावकऱ्यांनी दिनांक १३ मार्च २०२५ रोजी निवेदन दिले होते. त्यात १ मे २०२५ रोजी हे आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु याची दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी ३० दिवसात आम्ही आपल्या गावाची स्मशानभूमीची समस्या सोडवू असे लेखी पत्र दिले होते.
मात्र १५० दिवस उलटून गेले तरी देखील प्रशासनाने स्मशानभूमीची समस्या सोडविली नाही म्हणून गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ही समस्या मार्गी लागावी म्हणून पुन्हा आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम