वशंवाद हीच काँग्रसची ओळख ; मोदींचा हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ एप्रिल २०२३ । आज देशातील सर्वात मोठा पक्ष मानला जाणारा भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. १९८० मध्ये याच दिवशी भाजपची स्थापना झाली होती. भाजपचे पूर्वीचे नाव जनसंघ होते जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाले. दरम्यान पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षाच्या उभारणीसाठी आणि वाढीसाठी ज्यांनी आपले रक्त दिले त्या महान व्यक्तींना मी नमन करतो, असे मोदी यावेळी म्हणाले.

भारत बजरंगबलीप्रमाणे बलशाली बनत आहे. बजरंबबलीचे जीवन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. देश प्रथम हाच आमचा मुलमंत्र आहे. आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमान जयंती साजरी करत आहोत. आजही हनुमानजींचे जीवन भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर देखील टिका केली. काँग्रेस म्हणजे घराणेशाही आहे. त्यांची संस्कृती आणि विचार लहान आहेत. परिवारवाद, वशंवाद हीच काँग्रसची ओळख असल्याचे मोदी म्हणाले.नरेंद्र मोदी म्हणाले, आज सर्वत्र बजरंगबलींच्या नावाची घोषणा करत आहेत. त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे. बजरंगबलीप्रमाणे एका महासत्तेप्रमाणे भारताला आपल्यातील सुप्त शक्तींचा साक्षात्कार झाला आहे. हनुमानजी स्वतःसाठी काहीही करत नाहीत ते सर्व इतरांसाठी करतात. जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते खूप कठोर झाले, त्याचप्रमाणे भारतातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा भाजप कठोर बनते, असे मोदी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम