
वयोश्री अंतर्गत कुटीर रुग्णालयात तपासणी शिबिर
पारोळा
येथील कुटीर रुग्णालय व नगरपरिषद पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने वयोश्री अंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या तपासणी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे गुडघेदुखी, दिसून न येणे, ऐकू कमी येणे, बसण्यास त्रास होणे या सारख्या तपासण्या करून अर्ज भरण्यात आले. यात कुटीर रुग्णालयाचे 150 अर्ज तर नगर परिषदेचे 250 अर्ज स्वीकारण्यात आले आहे. या अर्जाची पडताळणी करण्याकरिता सामजिक आरोग्य विभाग येथे हे अर्ज पाठविण्यात आले आहे.
या तपासणी अतंर्गत ज्या जेष्ठ नागरिकांना लाठी, ध्वनी यंत्र किंवा चष्मा अश्या गरजेचे वस्तू लागणार असतील त्यांना त्या वयोश्री योजना अंतर्गत पुरवण्यात येतील असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत रनाळे, डॉक्टर जिनेन्द्र पाटील आपला दवाखाना चे डॉ प्रशांत शिनकर, डॉ वैशाली नेरकर, आस्थापना प्रमुख यामिनी जटे, सहायक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, कुटीर रुग्णालय व नगरपरिषद चे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम