शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा !
बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ | धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे निष्टावंत कार्यकर्ते असलेले माजी आमदारांनी अजित पवार व त्यांच्या सोबत असलेले आमदारांनी थेट भाजपला साथ दिल्याने आता माजी आमदाराने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
धुळे येथील माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला पुनश्च हरिओम म्हणत राम राम ठोकला आहे. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोटे यांची गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे त्यांची घुसमट होत होती. यापूर्वी देखील गोटे यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात देखील पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजी बाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती, आणि त्यामुळेच पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे ते म्हणालेत. गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. याबाबत पक्षप्रमुख शरद पवार यांना देखील याबाबतची कल्पना दिली असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम